जामनेर (प्रतिनिधी):- मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार गिरीष भाऊ महाजन यांच्या प्रचारार्थ सौ. साधनाताई महाजन यांचे जामनेर मतदार संघात प्रचार दौरे सुरू असून दी .९ रोजी गावभेट दौरा लाखोली येथून सुरु होणार आहे . पुढे नाचनखेडा, लोहारा, म्हासास, रामेश्वर, कुऱ्हाड तांडा, कुऱ्हाड बु., कुऱ्हाड खू., गोराडखेडा, वेरुळी बु., वेरुळी खू., खेडगाव नंदीचे, बिल्दि, सादजगाव, सांगवी , नाईक नगर या गावांमध्ये प्रचार दौरे असणार आहेत.
तरी महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी जामनेर च्या वतीने करण्यात आले आहे.

+ There are no comments
Add yours