आ.एकनाथ खडसे, संजय सावंत, प्रा. कविता म्हात्रे यांची विशेष उपस्थिती.
जामनेर प्रतिनिधी):- येथील विधानसभेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली असून गिरीश भाऊ महाजन व दिलीप खोडपे सर यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचे तालुक्यात बोलले जाऊ लागले आहे. एका बाजूला तालुक्यावर ३० वर्षाची घट्ट पकड असलेले महायुतीची उमेदवार गिरीश भाऊ महाजन तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच तालीमेत तयार झालेले महाविकास आघाडीचे दिलीप खोडपे सर यांच्यात चुरस बघायला मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच पार्श्वूमीवर दि.९ रोजी महाविकास आघाडीचे उमेदवार खोडपे सर यांच्या समर्थनार्थ आ. एकनाथ खडसे, संजय सावंत, प्रा. कविता म्हात्रे या महाविकास आघाडीच्या प्रचारक असलेल्या नेत्यांची जाहीर सभा तालुक्यातील पहूर पेठ येथील आठवडे बाजाराच्या प्रांगणात संध्या. ठीक ७ वाजता आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती महाविकास आघाडी कडून देण्यात आली असून तालुक्यातील व पहूर परिसरातील नागरिकांनी जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याअगोदर पहूर परिसरातील गावांमध्ये खोडपे सरांचा प्रचार दौरा आयोजीत करण्यात आला आहे. त्यात टाकळी बु. ,टाकळीखू.,पिंपरखेडा,कोदोली, भागदरा, मोयगाव, लोंढरी तांडा, लोंढरी, शेरी, हीवरी हीवरखेडा, पिंपळगाव कमानी, पिंपळगाव तांडा, जांभूळ, वडगाव आणि संध्यकाळी पहूर येथे जाहीर सभा होणार आहे.
+ There are no comments
Add yours