जामनेर (प्रतिनिधी):- ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्ड मध्ये जामनेर मतदार संघात मतदार शपथ हा कार्यक्रम दि. ८ रोजी सकाळी १०.३० वाजता राजे छत्रपती शिवाजीनगर येथे घेण्यात आला.यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मतदार उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक विलास पाटील, योगेश बावस्कर , अनिल देशमुख, विनोद सपकाळे, सौ वंदना उंबरकर, सौ.रोहिणी चौधरी , कर्मचारी सुनील सपकाळे, महेंद्र कुमार पगारे, रविंद्र खंडारे यांनी विशेष परिश्रम घेतले.सदर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी वार्डातील मतदार व सर्व शिक्षकांचे शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले. असून सर्व मतदारांनी शंभर टक्के मतदान करावे व दी.८ रोजी मुंबई येथून संध्या. ५ वाजता स्वीप प्रक्षेपण कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
*ज्ञानगंगा विद्यालयाने १०० टक्के मतदान करण्याचे केले मतदारांना आवाहन.*

+ There are no comments
Add yours