सरपंच परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी  जितेंद्र माळी. महिला अध्यक्षपदी सौ.निता पाटील यांची नियुक्ती.

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

जामनेर (प्रतिनिधी):-  येथील पंचायत समिती मध्ये सरपंच परिषदेचे विभागीय अध्यक्ष राजमल भागवत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जामनेर तालुका सरपंच परिषदेची मीटिंग पार पडली.यात तालुक्यातील टाकळी खुर्द चे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र माळी यांची सर्वांनुमते तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर पाळधी येथील उपसरपंच व माजी पंचायत समिती सभापती सौ.निताताई कमलाकर पाटील यांची महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून तालुका उपाध्यक्षपदी अर्जुन पाटील, माधव महाजन यांची तर महिला उपाध्यक्ष पदी सौ. कल्पना राजेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सरपंच परिषदेचे विभागीय अध्यक्ष राजमल भागवत यांनी उपस्थित सदस्यांना सरपंच परिषदेचे धेय्य धोरणे व सरपंच परिषदेचे कार्य याबाबत माहिती विषद केली.

सरपंच परिषदेचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष टाकळी खुर्द चे सरपंच जितेन्द्र माळी व पाळधी येथील महीला उपसरपंच तथा प.स.माजी सभापती सौ.निताताई पाटील

यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष बाळू धुमाळ, जिल्ह्या सचिव युवराज पाटील, जिल्हा समन्वयक श्रीकांत पाटील,तालुका समन्वयक बाळू चव्हाण , कमलाकर पाटील,तसेच तालुक्यातील सरपंच,उपसरपंच,तसेच सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours