*आज धुळे , नाशिक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा.*

जळगांव (प्रतिनिधि):-  राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना केंद्रीय राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा आज दी.८ पासून महाराष्ट्रात पार पडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवार ८ नोव्हेंबर रोजी खान्देशात येत असून  विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या प्रचार सभेसाठी धुळे शहरातील गोशाळा मैदानावर धुळे जिल्ह्यातील पाच व मालेगाव बाह्य मतदार संघातील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांची पहीली भव्य सभा पार पडत आहे.तर दुसरी सभा त्यांची आजच नाशिक मध्ये आयोजीत करण्यात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात एकूण १० सभा टप्या टप्प्याने होणार असून त्याचा फायदा राज्यात महायुतीला होणार असल्याचे व महायुतीचेच सरकार महाराष्ट्रात स्थापन होणार असल्याचे भाकीत माजी मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी केले आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी पक्षाने त्यांच्याकडे सोपविल्या मुळे त्यांच्या जामनेरातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सौ. साधनाताई महाजन व कार्यकर्त्यांची फळी उत्कृष्टपणे सांबळतांना दिसून येत आहेत.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours