पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
अपघातात चिंचखेडा बु.येथील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश २ मयत १ जखमी.
जामनेर (प्रतिनिधी):- फिओरी मिक्सर व प्रवासी पॅगो रिक्षा यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात मायलेकीसह ३ जण ठार तर रिक्षा चालकासह ५ जण जखमी झाल्याची घटना भुसावळ रोडवरील गंगापूरी गावाजवळ दि.१३ रोजी ७ वाजेच्या सुमारास घडली असून जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.मिक्सर वाहनावरील चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
दि.१३ रोजी सायंकाळी फिओरी मिक्सर क्रमांक एम एच १९ सी एक्स २१८१ हे जामनेर कडून भुसावळ कडे जात होते. तर योगेश विठ्ठल गायकवाड वय ४० राहणार जामनेरपुरा हे आपल्या पॅगो रिक्षात प्रवासी घेऊन भुसावळ येथून जामनेर कडे येत होते.दोघ वाहनं गंगापुरी गावाजवळ एकमेकांसमोर आले.जामनेर ते भुसावळ रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्यामुळे एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने दोघं वाहनांच्या चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने ते एकमेकांवर आदळल्यामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.जखमीना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते . त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले आहे.त्यावेळी पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार,नगरसेवक श्रीराम महाजन,रविंद्र झाल्टे,सुभाष पवार, पंचायत समितीचे माजी गटनेते अमर पाटील,डॉ.नंदलाल पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेऊन जखमीची विचारपूस करून त्यांना मदत केली.
मयतामध्ये सरला व निकिता या चिंचखेडा बु//येथील दोघ मायलेकी आहेत.तर निकिताचा नुकताच साखरपुडा झाला असून पुढील महिन्यात २३ जानेवारी रोजी तिचा विवाह होणार असल्याचे सांगितले जात आहे.या अपघातात चिंचखेडा बुद्रुक येथील निंबाळकर कुटुंबातील ३ जणाचा समावेश असून २ दोघं मायलेकीचा मृत्यू झाला असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर दी.१४ रोजी सकाळी १०:३० वाजता चिंचखेडा बु. येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भुसावळ ते जामनेर महामार्ग रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून अशा अपघातामुळे अनेक जणांचा बळी जात आहे.त्यामुळे रूंदीकरणाचे काम त्वरीत पुर्ण करावे अशी मागणी वाहन चालकांकडून केली जात आहे.
@मयत
सरला गोपाळ निंबाळकर वय ३९ , निकिता गोपाळ निंबाळकर वय २० दोघं राहणार चिंचखेडा बुद्रुक तालुका जामनेर ,प्रमोद श्रीराम गुरूभैय्या वय ३२ राहणार तळेगाव तालुका जामनेर
@जखमी
जयेश गोपाळ निंबाळकर वय १६ राहणार चिंचखेडा बु.,योगेश विठ्ठल गायकवाड वय ४० राहणार जामनेरपुरा ,सुरेखा विलास कापडे वय ५० , संगिता सुभाष चौधरी वय ५० दोघं राहणार छत्रपती संभाजीनगर, अखिलेश कुमार वय ५० राहणार उत्तर प्रदेश.

+ There are no comments
Add yours