पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
२५० गरीब कुटुंबाला राशन किटचे झाले वाटप.
जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील फत्तेपूर येथे चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन या सेवेभावी संस्थेचे संचालक संदीप सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली गरजू बांधवांना राशन किटचे वाटप करण्यात आले.सध्या मुस्लीम बांधवांचा रमजान महिना सुरु असून याला मुस्लिम समाजात पवित्र महिना म्हणुन संबोधले जाते. या पवित्र महिन्यात लहान मोठे मुस्लिम बांधव उपवास (रोजा) धरत असतात. या समाजातील गोर गरीब बांधवान पर्यंत सुद्धा आपली मदत पोहचावी या उदात्त हेतूने चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन चे संदीप सिंग यांनी जामनेर तालुक्यातील पत्तेपूर येथे व मुंबई भागातील विरार, बोईसर या भागात राशन किटचे वाटप करून सर्वच समाजाप्रती आपले ऋणानुबंध घट्ट असल्याचे दाखवून दिले.


राशन किट मध्ये तेल पाऊच, शेंगदाणे, चना दाळ ,हरबरा दाळ ,साखर असे रोज वापरात येणारे खाद्य पदार्थ आहेत. चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन विरार ही सेवाभावी संस्था संदीप सिंग यांचे मार्गदर्शन खाली महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात गरीब कुटुंबाप्रती आपली सेवा देत असते. वेग वेगळे सामाजिक उपक्रम हाती घेऊन चालणारी राष्ट्रीय स्तरावरील एकमेव संस्था असल्याचे बोलले जाते. अनाथ मुलांना अर्थिक मदत, शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वृद्ध, दिव्यांग बांधवांना राशन किट असे विविध समाजिक उपक्रम वर्षभर संस्थेमार्फत राबविण्यात येत असतात. राशन किट मिळालेल्या गरजु कुटुंबानी चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन चे अध्यक्ष संदीप सिंग,अमरिन पेंटर ट्रस्टी, रिना नवले, अवंतिका महाडीक, राकेश नेमन ,वैभव खेडेकर यांचे मनापासून आभार मानले.
+ There are no comments
Add yours