जामनेर (प्रतिनिधि):- तालुक्यातील शेंदुर्णी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या समर्थांनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहीत पवार यांची झालेली प्रचार सभा व सभेला स्वयंस्पृतीने झालेल्या गर्दी ची जोरदार चर्चा तालुक्यात होतांना दिसत आहे.
विधानसभेचा बिगूल वाजल्या पासून जामनेर मतदार संघात तब्बल ६ वेळा विजयी झालेले माजी मंत्री तथा आमदार संकटमोचक गिरीश भाऊ महाजन हे ७ व्यांदा महायुतीकडून भाजप ची उमेदवारी करीत असल्याने व तालुक्यातील विरोधी पक्षातील मातब्बर नेते भाजप मध्ये दाखल झाल्याने त्यांच्या विरोधात टक्कर देणारा तोडीस तोड नेता विरोधी पक्षात कोणीच नसल्याची भावना तालुक्यातील शहरासह ग्रामीण भागात होतांना दिसून येत होती. त्यामुळे गिरीश महाजन यांचा जामनेर विधानसभेत एकतर्फी विजय होईल असेच तालुक्यातील जनतेला व भाजप कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र भाजपच्याच तालीमेत तयार झालेले व ३५ वर्षापासून गिरीश भाऊ महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीला सामोरे गेलेले एकेकाळचे सहकारी जामनेर तालुक्याला प्रथमच लाल दिव्याचा मान गिरीश महाजन यांच्या अगोदर मिळवून देणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे सर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी हाथी घेऊन गिरीश महाजन यांच्या पुढे आव्हान उभे केले. तरीही काल पर्यंत जामनेर विधानसभा मतदार संघाची निवडणूक एकतर्फीच होईल असेच विषय तालुक्यात चर्चिले जात होते. मात्र खोडपे सरांनी तालुक्यात प्रचार सूरू केल्यापासून त्यांना मिळणारा प्रतिसाद व वाढता पाठिंबा यासोबतच मतदारांकडून आर्थिक पाठबळ सुद्धा मिळतांना दिसून येत असल्याने भाजपला ही निवडणूक सोपी व एकतर्फी राहीली नसून मतदार संघात काट्याची टक्कर होईल. असे मत तालुक्यातील सुज्ञ मतदार व्यक्त करतांना दिसून येत आहेत. त्यातच नुकतीच महाविकास आघाडीच्या वतीने मतदार संघातील शेंदुर्णी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहीत पवार यांची झालेली प्रचार सभा चर्चेचा विषय ठरत असून मतदारांची झालेली गर्दी खोडपे सरांना मताधिक्य मिळवून देणार का? हे येणारा काळच ठरवेल.

+ There are no comments
Add yours