जामनेर (प्रतिनिधी):- विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात जामनेर मतदार संघात एकूण १० उमेदवार रिंगणात असले तरी महायुतीचे ७ व्यांदा उमेदवारी करीत असलेले गिरीश भाऊ महाजन विरूद्ध महाविकास आघाडीचे दीलीप खोडपे सर यांच्यातच खरी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले असून गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते तालुक्यातील वाडीकिल्ला येथील जागृत देवस्थान मंदीर म्हणून परिचीत असलेले व याच मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असलेले गिरीश भाऊ महाजन यांनी येथे नारळ वाढवून विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी सौ.साधनाताई महाजन,संजय दादा गरूड, शिवाजी नाना सोनार,जे के चव्हाण, जितू पाटील,चंद्रकांत बावीस्कर, गोविंद अग्रवाल, प्रदीप लोढा, नवलसिंग पाटील, विलास बापू पाटील, राजमल भागवत, कैलास पाटील, अशोक भोईटे डॉ. प्रशांत भोंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.

तर जळगांव छ .संभाजी नगर हवे रोडवर असलेल्या सुंनसगाव फाटा येथील भवानी मातेच्या मंदिरात महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांच्या हस्ते नारळ वाढवून त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. दोन्ही उमेदवारांनी आप आपल्या परीने विजयासाठी भवानी मातेला साकडे घातले असून या ठिकाणी सौ.विद्याताई खोडपे,डी के पाटील, शंकर राजपूत, अँड .ज्ञानेस्वर बोरसे, डॉ.मनोहर पाटील, किशोर पाटील, डॉ.प्रशांत पाटील, जगदेव बोरसे, दिलीप पाटील, प्रल्हाद बोरसे, दत्ता भाऊ साबळे, अनिल पाटील यांच्या सह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.होऊ घातलेल्या २० तारखेच्या निवडणूकीत भवानी माता कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात विजयश्री ची माळ टाकते हे निकालाच्या दिवशी म्हणजे २३ तारखेलाच समजणार आहे. दोन्ही उमेदवारांनी गाव भेटीवर लक्ष केंद्रीत केले असून मतदारांना प्रतेक्ष भेटून प्रचाराला सुरुवात केली आहे.

+ There are no comments
Add yours