पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
बजरंगपुरा, माळी गल्ली व श्रीराम पेठ मंडळांनी केले होते आयोजन.
जामनेर (प्रतिनिधी):- शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पिठोरी अमावस्येला ग्रामदैवत खंडेराय महाराज व मरीआई च्या आशीर्वादाने गेल्या १०० वर्षापासून बारा गाड्या ओढण्याची परंपरा असून यासाठी शहरातील भाविक मोठ्या संख्येने बारा गाड्या पाहण्यासाठी गर्दी करीत असतात. यावेळी सुद्धा बजरंगपुरा मित्र मंडळाच्या वतीने शहरातील भुसावळ रोड चौफुली येथून विश्वकर्मा चौक हिवरखेडा रोड पर्यंत बारा गाड्या ओढण्यात आल्या.


तर माळी गल्ली मित्र मंडळाच्या वतीने ग्रामदैवत खंडेराव महाराज मंदीर पाचोरा रोड येथून बारा गाड्या ओढण्यात येऊन राजमाता जिजाऊ चौकात समारोप झाला. तसेच श्रीराम मित्र मंडळाच्या बारागाड्या ह्या दसरा मैदानापासून ते श्रीराम मंदिरा पर्यंत ओढण्यात आल्या. या वेळी ना. गिरीश महाजन यांची विशेष उपस्थिती होती.
बारा गाड्या बघण्यासाठी व त्यात बसणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले. हा उत्सव शांततेत पार पडला. या वेळी जामनेर पोलीस निरीक्षक एम एम कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोक बंदोबस्त ठेवला होता. तसेच नगर परिषदेच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा दिवा बत्तीची व्यवस्था करण्यात आली होती.


+ There are no comments
Add yours