*कुंभारी सिम येथे बांधावर लावली गावाच्या लोकसंख्ये इतकी झाडे.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज

मराठा सेवासंघ उद्योग कक्षाचे जिल्हाध्यक्ष यांचा अनोखा उपक्रम.

 जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील कुंभारी सिम गावाचे भुमिपुत्र तसेच मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे जिल्हाध्यक्ष समाजसेवक आबासाहेब पाटील यांनी दी.१९ रोजी वृक्ष लागवडीचा अनोखा उपक्रम राबवून आपल्या शेताच्या बांधावर गावातील लोकसंख्ये इतके म्हणजे ५२५ वृक्ष लागवड करून एक आदर्श समाजापुढे उभा केला आहे.तसेच आबासाहेब पाटील यांनी यापूर्वी देखील त्यांच्या माध्यमातून तालुक्यात होणारे विवाह सोहळे वेळेवर लागावे यासाठी ५ हजाराचे बक्षीस देऊन समाजात एक आदर्श पायंडा पाडण्याचे काम केले होते.त्यामुळे लग्न वेळेवर लागत असल्याने लग्न सोहळ्यासाठी जमलेल्या नातेवाईकांना,मित्र मंडळींना व आप्तेष्टांना ताटकळत जास्त वेळ बसावे लागत नसल्याने त्यांच्या या कार्याचे तालुक्यात सर्वत्र कौतुक करण्यात येत होते.त्याच बरोबर लग्न कार्यात बँडच्या तालावर दारू पिऊन झिंगणाऱ्यांचे प्रमाण कमी होतांना दिसून आले होते.लग्न कार्यात वायफळ खर्च न करता कमी खर्चात लग्न कार्य कसे पार पाडता येईल याचा विचार करणे आवश्यक असल्याचे मत ते नेहमीच बोलून दाखवत असल्याने समाज कार्याची तळमळ यातून दिसून येते.

 यासह कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी लसीकरणाच्या शिबीराचे यशस्वी आयोजन करून समाज कार्याची चुणूक दाखवून दिली होती. झाडे लावण्यासारखे उपक्रम राबवून त्यांनी सुरू केलेल्या अशा समाज कार्याची दखल प्रत्येक गावातील नागरिकांनी घेतल्यास आपल्यावर ओढवणारे नैसर्गीक आपत्तीचे संकट काही प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होणार असल्याच्या भावना जानकर व्यक्त करतांना यावेळी दिसून येत होते.यावेळी तालुक्यातील देवपिंपरीचे सरपंच तथा भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तुकाराम निकम, नाचणखेडा येथील मंगेश महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते दिलीप खोडपे सर, या लोकनेत्यांच्या हस्ते वृक्ष रोपण करून त्यांनी आपल्या स्वतःच्या शेताच्या बांधावर मोहगणी या जातीच्या  वृक्षाची ५२५  झाडांची लागवड करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी त्यांच्या माध्यमातून उचललेले छोटेसे पाऊल आदर्शवत म्हणता येईल. तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी अशाच प्रकारे बांधावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. यावेळी कुंभारीसिम येथील रमेश पाटील, शरद पाटील, अनिल पाटील, युवराज पाटील, युवराज कोळी, रविंद्र पाटील, गोपाल पाटील, रामकृष्णा पाटील, समाधान भगत ,राहुल पाटील, संदिप पाटील, सावखेडा येथील मा उपसरपंच मनोज पाटील, नांद्रा येथील अविनाश वाघ, भगवान पाटील, बापु पाटील, दिवाकर पाटील, विराट बायो प्लॅटेक प्रा.ली.कंपनीचे जितेंद्र सिंह, ज्ञानेश्वर माळी ,गजानन हिवाळे यांच्यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours