पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
जामनेर तालुक्यातील शेरी जि.प.शाळेला उपशिक्षणाधिकांची सदिच्छा भेट.
जामनेर – दि. 16 ऑगस्ट रोजी तालुक्यातील शेरी जि. प .शाळेला जळगाव जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांनी सदिच्छा भेट दिली. असून येथील इयत्ता १ ते ४ मधील निपुण विद्यार्थ्यांची पडताळणी करून समाधान व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमळ संवाद साधून त्यांना अध्ययन विषयक मौल्यवान मार्गदर्शन दिले.
शाळेतील शैक्षणिक उपक्रम व वातावरणाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. एकीकडे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असतांना शेरी येथील जिल्हा परिषद शाळेत मात्र विद्यार्थी संख्या वाढत चालली असून याचे संपूर्ण श्रेय शिक्षक वृंद व शेरी ग्रामस्थांना जाते. येथील शिक्षकांनी बदलत्या काळानुसार बदल घडवून आणला असून गावातील विद्यार्थी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेण्यासाठी जात असतांना येथे मात्र विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून काढून गावातीलच जिल्हा परिषद शाळेत टाकतांना पालक वर्ग दिसून येत आहे.

ही जिल्हा परिषद शाळेसाठी जमेची बाजू म्हणता येईल. येथील जिल्हा परिषद शाळेत अभ्यासा बरोबरच नवनवीन ऍक्टिव्हिटीज राबवल्या जात असून इंग्रजी मध्ये सुद्धा येथील विद्यार्थी निपुण असल्याचे पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. त्यामुळेच शाळेला वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी सतत सुरू असल्याचे शेरी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. विजय सरोदे साहेबांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून शिक्षकवर्गालाही अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली असल्याची भावना शिक्षक वृंद यावेळी बोलतांना दिसून आले.शाळा व्यवस्थापन समिती व जि.प. शाळा शेरी परिवाराकडून उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


+ There are no comments
Add yours