पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
जामनेरातील सोनेश्वर मंदिराच्या परिसरात माजी सभापतीपतीची आत्महत्या.
सोनबर्डी पुन्हा चर्चत.
जामनेर (प्रतिनिधी):- शहरातील नगरपरिषद हद्दीत असलेली सोनबर्डी(सोनेश्वर मंदीर परिसर) हि गेल्या काही वर्षांपासून नेहमी चर्चत राहिली आहे.कधी पर्यटना विषयी तर कधी अचानक अनवधनाने झालेल्या दुघटनेमुळे. काही दिवसांपूर्वी इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्याचा स्विमींग पूल मध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.अशीच दुर्घटना दि. २२ रोजी २०२०- २१ मध्ये जामनेर पंचायत समितीच्या माजी सभापती राहिलेल्या सुनंदा प्रल्हाद पाटील यांचे पती प्रल्हाद एकनाथ पाटील वय ६२ यांनी शहरातील नावाजलेल्या नगरपरिषद हद्दीतील सोनेश्वर मंदीर परिसरात झाडाला फाशी घेवून आत्महत्या केल्याची घडली आहे. त्यांना बी पी, शुगर चा अती त्रास असल्याने व त्यांची मानसिक स्थिती बरी नसल्याने त्यांनी द्रुधर आजाराला कंटाळून आत्महत्या सारखे पाऊल उचलले असल्याची चर्चा जामनेर शहरात होतांना दिसून येत होती.
प्रल्हाद पाटील हे पेशाने शिक्षक होते.त्यानी २०२०- २१ मध्ये स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. त्याच काळात त्यांच्या पत्नि सुनंदा पाटील ह्या जामनेर पंचायत समितीच्या सभापती म्हणून विराजमान झाल्या होत्या. प्रल्हाद पाटील हे मित भाषी व हजरजबाबी स्वभावाचे होते.ते राजकीय क्षेत्रात व वैयक्तिक जीवनात मिळून मिसळून राहण्यात धन्यतामानायचे.असे हसत खेळत जीवन जगणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने आत्महत्या सारखे पाऊल उचलावे हे फार मोठे कोडे असून हाच विषय तालुक्यात चर्चीला जात आहे .
प्रल्हाद पाटील यांच्या आत्मघातकी निर्णयामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्यांचे कारण मात्र समजू शकले नाही.रात्री उशीरा पर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. जामनेर पोलीस निरीक्षक एम एम कासार यांच्या निरीक्षणाखाली पुढील कार्यवाही सुरू होती.
त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा,सुन,तीन नातवंड असा परीवार आहे.त्यांच्यावर दी.२३ रोजी सकाळी ९:३० वाजता रहाते घर महुखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

+ There are no comments
Add yours