*विठुरायाच्या दरबारी निघाली जामनेर करांची आनंदाची वारी.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज

विठुरायाच्या दरबारी निघाली जामनेर करांची आनंदाची वारी.
ना.गिरीश महाजन घडवताय ज्येष्ठांना पंढरपूर दर्शन.

जामनेर (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा विठुराया या विठ्ठलाचे दर्शन तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना सुलभ रीत्या घेता यावे यासाठी ना.महाजन यांनी भुसावळ येथून विशेष रेल्वेची व्यवस्था करून आनंदाची वारी ही विशेष यात्रा आयोजीत केली.त्यांच्या सोबत विठुरायाचा गजर करत स्वतः आपल्या फॅमेली सह सामील होऊन पंढरपूरला रेल्वेने निघाले.या वारीत असंख्य वारकऱ्यांसोबत सहभागी होत विठू नामाचा गजर करत पंढरपूरला जाताना मलाही आध्यात्मिक आनंद अनुभवण्याचे भाग्य मिळाल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

दिंडीत सामील झालेले ना. महाजन व भाविक

तत्पूर्वी जामनेर शहरातील श्रीमंत बाबाजी राघो पाटील मंगल कार्यालय ते विश्वकर्मा चौकापर्यंत पायी दिंडीचेही आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुस्लीम भाविकांनी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांवर पुष्पृष्टी करून एक आदर्श प्रस्थापित केला.विश्वकर्मा चौक येथून एस टी (बस) ने भाविकांना भुसावळ पर्यंत सोडण्यात आले.व तेथून विशेष रेल्वेने भाविकांची आनंदाची वारी पंढरपूरला ना.महाजन यांच्या हस्ते विशेष रेल्वेला झेंडा दाखवून रवांना करण्यात आली.यावेळी टाळ मृदंगाच्या गजर करत, विठू नामाचा जयघोष करत आनंदाची वारी निघाली पंढरपूरच्या दिशेने.

विठु माऊली ची आरती घेतांना ना. महाजन व सौ. साधनाताई महाजन आणि कार्यकर्ते, भाविक

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours