*एकुलती,दोंदवाडे येथे मराठा सेवा संघाने घेतला समाज प्रबोधन मेळावा.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज

एकुलती,दोंदवाडे येथे मराठा सेवा संघाने घेतला समाज प्रबोधन मेळावा.

पुस्तकं देऊन केलं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

जामनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील एकुलती बु येथे मराठा सेवा संघा तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि सावित्रीआई फुलेंच्या प्रतिमेचे गावातील नागरिकांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रथम गावातील १० वी आणि १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी म्हणून “गीतजागर” व “मराठा सेवा संघाने समाजाला काय दिले” ही पुस्तके भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी इयत्ता ७ वी मधील नीरज वारंगणे याने आपले मनोगत व्यक्त केले. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिपक ढोणी यांनी उपस्थित गुणवंत विद्यार्थी व पालकांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचे आपण साक्षीदार होत असून महाराजांचे आरतीच्या माध्यमातून होणारे दैवतीकरण थांबवण्याबाबत उपस्थिताना कळकळीचे आवाहन केले.

याप्रसंगी गावातील इयत्ता १० वी मधील खुशी पाटील, विद्या  ब्राह्मणे, विपुल पाटील, लोकेश ठाकरे, शिवचरण  सोनवणे, वैभव पाटील, सागर पाटील आणि रवींद्र  पाटील यांचा तर इयत्ता १२ वीतील शिवानी पाटील, अजय सकट, गोकुळ जाधव, आदित्य कोळी, हर्ष लोखंडे, गौरव पाटील, शुभम कोळी, मोहिनी सोनवणे, दिपक  पाटील, ऋषिकेश पाटील आणि हर्षदा पाटील यांचा पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश पाटील यांनी केले. तर दिपक पाटील सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी गावातील नागरिकांसह महिलांची विशेष उपस्थिती होती.

याप्रसंगी गावातील इयत्ता १० वी मधील ओम पाटील,

दोंदवाडे येथील गुणवंत विद्यार्थी

मानसी शिंदे, ओम पाटील, श्रद्धा परदेशी, कृष्णा बडगुजर, भावना  पाटील, वेदांत हावळे, स्नेहा पाटील, शिवम बडगुजर, वैशाली परदेशी, माया परदेशी, जयेश परदेशी, उमेश पाटील, हर्षवर्धन पाटील, महेश लोहार तर १२ वी तील नितीन पाटील, राज बडगुजर, करण  बडगुजर, देवेश कोळी, रितेश पाटील, विपुल बडगुजर, कल्याणी लोहार, सोनाली बडगुजर आणि पल्लवी  पाटील यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours