पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
जामनेर( प्रतिनिधी):- दि.६ मे रोजी आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे तालुक्यातील हिवरखेडे बु.येथील शेतकऱ्यांच्या केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून. याबाबत तात्काळ पाहणी करण्यासाठी विनय गोसावी उपविभागीय अधिकारी जळगाव, नानासाहेब आगळे तहसीलदार जामनेर, तालुका कृषी अधिकारी, जामनेर, तसेच स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व शेतकरी बांधव यांच्या उपस्थितीत घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली.या पाहणीनंतर प्रांताधिकारी, जळगाव यांनी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने उपाययोजना केली जात असल्याची माहिती जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी पत्रकारांना दिली असून संबंधित विभागांना आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.

+ There are no comments
Add yours