*जामनेर पंचायत समितीची जुनी इमारत पाडतांना घडली दुर्घटना, ४ मजूर जखमी .*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

 स्लॅब खाली दाबले गेलेल्या दोघांना बचाव पथकाने सुखरूप काढले बाहेर.

जामनेर (प्रतिनिधी):- येथील पंचायत समितीची जीर्ण झालेली जुनी इमारत जेसीबी च्या सहाय्याने पाडण्याचे काम सुरू होते. पाडलेल्या ढिगाऱ्या मधून  लोखंडी खिडक्या, दरवाजे, आसाऱ्या काढण्यासाठी मजूर या ठिकाणी काम करीत होते. इमारतीचा काही भाग कोसळताच अशोककुमार विश्वकर्मा व विकास विश्वकर्मा हे उत्तर प्रदेश मधील दोघ मजुरांनी बाजूला उड्या मारल्याने ते थोड्क्यात बचावले त्यांना जखमी अवस्थेत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तर सुजीत विश्वकर्मा व भोजू समा तंवर हे दिगाऱ्याखाली दाबले गेल्याने. त्यांना काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने बचाव पथकाला पाचारण करण्यात आले होते. बचाव पथकासह स्थानिक लोकांच्या मदतीने स्लॅब खाली दबलेल्या दोघांना दोन ते तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर सुखरुप बाहेर काढण्यात आले.जखमी अवस्थेत त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

नेहमी प्रमाणे कार्यतत्परता दाखवत जालमसिंग राजपूत यांनी जखमी मजुरांना प्रथम उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. बचावकार्य सुरु असताना तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलिस निरीक्षक मुरलीधर कासार, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, जितेंद्र पाटील, चंद्रकांत बाविस्कर, महेंद्र बाविस्कर, डॉ. प्रशांत भोंडे, उल्हास पाटील, सुहास पाटील,आतिष झाल्टे यांच्यासह प्रमूख राजकिय पक्षाचे कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही घटना जामनेरात दि.२१ रोजी संध्या.४ वाजेच्या सुमारास घडली असून दैव बलवत्तर म्हणून दोघांचे प्राण वाचले असल्याची एकच चर्चा जामनेर तालुक्यात होतांना दिसून येत आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours