पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
होळीच्या निमित्ताने नगरसेवकांनी दाखवले परिवर्तनाचे रंग.
बोदवड:-( सुहास बारी)- बोदवड शहरातील ३ नगरसेवकांचा १३ रोजी शिवसेनेत ,तर १४ रोजी ३ नगरसेवकांचा भाजप मध्ये प्रवेश झाल्याने आ. एकनाथ खडसेंना जोरदार धक्का बसला आहे. येथील नगर परिषद चे नगरसेवक हकीम बागवान , मुजम्मील शाह , नगरसेविका एकताबी लतीफ शेख यांच्या वतीने त्यांचे पती लतीफ शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर प्रभावित होऊन आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुंबई येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुक्तागिरी बंगल्यावर जाहीर प्रवेश केला. बऱ्याच दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ( शरद पवार गट) काही नगरसेवक शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. आता आ. एकनाथ खडसेंच्या विश्वासू सहकारी नगरसेवकांचे शिवसेनेत व भाजपमध्ये प्रवेश झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ( शरद पवार गट)धक्का बसला आहे. एकीकडे 13 रोजी आ.एकनाथ खडसेंचा बोदवड दौरा पार पडलेला असतांना दुसरीकडे निकटवर्तीय नगरसेवकांचा शिवसेनेत व भाजपमध्ये झालेला प्रवेश हा त्यांना धक्का देणारा आहे.

याप्रसंगी नगराध्यक्ष आनंदा पाटिल , उपनगराध्यक्ष संजय गायकवाड, नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक सुनिल बोरसे , नगरसेवक निलेश माळी, नगरसेवक प्रितेश जैन , नगरसेवक हर्षल बडगुजर , शिवसैनिक अमोल व्यवहारे आदि उपस्थित होते.दि.१३ रोजी झालेल्या प्रवेशानंतर दी.१४ रोजी जामनेर येथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते व भाजपा अध्यक्ष मधुकर राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील नगरसेवक कडूसिंग उर्फ भरत पाटील, सौ योगिता ताई खेवलकर, सौ पूजा ताई पारधी,माजी स्वीकृत नगरसेवक डॉ.सुधीर पाटील,काँग्रेस महिला तालुका अध्यक्ष उषाताई पाटील आणि इतर पदाधिकारी यांचा भाजपा मध्ये प्रवेश सोहळा पार पडला. या वेळी जिल्हा चिटणीस परमेश्वर टिकारे, तालुका उपाध्यक्ष विक्रम पाटील,शहर अध्यक्ष पवन जैन, तालुका सरचिटणीस पंकज डिके उपस्थित होते. याप्रवेश सोहळ्यामुळे महायुतीला बळ मिळाले असून विरोधी बाकावर बसण्यास कोणीही तयार नसल्याचे यातून दिसून येते.
+ There are no comments
Add yours