रावेरात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा. शिरवाडकर यांच्या जयंती निमित्त मराठी भाषा दीन साजरा.
रावेर (प्रतिनिधी):- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात वि. वा. शिरवाडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.सर्व प्रथम वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेस प्रा.एस.बी महाजन व कामगार नेते दिलीप कांबळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष तथा मा.नगरसेवक जगदीश घेटे यांनी यावेळी प्रस्ताविक करून वाचनालयात उपस्थीत असलेल्या वाचकांना आद्य कवी कुसुमाग्रज यांच्या विषयी माहिती विषद करून मराठी भाषा दीन साजरा करण्यात आला.यावेळी समाजिक कार्यकरते राजेंद्र अटकाळे मा.मुख्याध्यापक कैलास भालेराव, विजय खैरे इकबाल अहमद , पांडुरंग महाजन, शे हारूण, आसिफ तडवी, प्रकाश माळी, सी.आर.पाटील, नरेंद्र पाटील, निलेश तायडे, बिजलाल परदेशी, नरेश लोहार, मयुर गडे, आदींसह वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
+ There are no comments
Add yours