पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
जामनेरात घडली दुर्दैवी घटना.
जामनेर (प्रतिनिधी):- येथील सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या स्विमिंग पुलाच्या पाण्यात बुडून इयत्ता ८ वी मध्ये शिकणाऱ्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दी.२८ रोजी संध्या. ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे .
त्याचे सविस्तर असे की, मूळचा सोयगाव तालुक्यातील घोसला येथील रहिवाशी संकेत निवृत्ती गव्हांडे (पाटील) वय १४ हा ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेला मुलगा शंकर नगर हिवरखेडा रोड येथे आपला मोठा भाऊ व आजी सोबत शिक्षणाकामी भाड्याची रूम घेऊन राहत होता. आज दी.२८ रोजी संकेत हा आपल्या मित्रांसोबत सोनेश्वर मंदीर व परीसर बघण्यासाठी गेला होता.जवळच स्विमिंग पूल असल्याने संकेत त्या ठिकाणी पोहचला. गेल्या दोन वर्षापासून बंद असलेल्या स्विमिंग पूलमध्ये नुकतेच पाणी भरण्यात आले होते. स्विमिंग पूल सुरु करण्यासाठी नगर परिषद प्रयत्नशील असल्याचे समजते. स्विमिंग पूल बघण्यासाठी संकेत पाटील हा आपल्या मित्रांसमवेत स्विमिंग पुलाच्या पाण्यात उतरला असल्याची माहिती समोर आली असून पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून घटनास्थळी जामनेर पोलीस दाखल होऊन पोलीस निरीक्षक एम एम कासार यांच्या नेतृत्वाखाली पुढील कार्यवाही करण्याचे काम रात्री उशीरा पर्यंत सुरू होते.
+ There are no comments
Add yours