पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
जामनेरात ७६ वा प्रजासत्ताक दीन उत्साहात साजरा.
जामनेर (प्रतिनिधी):- शहरातील तहसील कार्यालयात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जामनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक एम एम कासार यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली.तसेच जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक नितिन बागूल यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ चौकातील बी ओ टी कॉम्प्लेक्स मध्ये ध्वजारोहण करण्यात आले.याव्यतिरिक्त शहरातील सर्व शासकीय कार्यालयात व शाळा महाविद्यालयात प्रजासत्ताक दीन उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील पंडित दीनदयाल शिक्षण संस्थेच्या एकलव्य प्राथमिक व ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात ७६वा प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपशिक्षक निलेश पाटील यांनी संविधान वाचन केले. तर विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी तंबाखू मुक्त शाळा या बाबत विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना शपथ दिली. यावेळी संस्थेचे मार्गदर्शक संचालक ॲड. शिवाजी नाना सोनार, के.बी.माळी सर, सिनेट सदस्य दीपक पाटील, एकलव्य विद्यालयाचे निलेश पाटील, आय एम आर कॉलेज चे प्राचार्य किशोर पाटील व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यालयात कला उत्सव साजरा करण्यात आला.त्यात एकलव्य बाल विकास प्राथमिक माध्यमिक व ज्ञानगंगा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले.

तसेच वाकी खुर्द सोनेश्वर मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या जिनियस इंटरनॅशनल स्कूल मध्ये डॉ. निलेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व यावेळी विविध स्पर्धा प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे अध्यक्ष भिमराव पाटील, संचालक पंढरीनाथ पाटील, डॉ.नंदलाल पाटील, अशोक पाटील, उदय पाटील, डॉ.निलेश पाटील, नितिन पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळ, प्राचार्य मॅडम,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच शहरातील प्रसिद्ध ज़िकरा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू उर्दू प्राथमिक शाळा व ज़िकरा इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये संस्था अध्यक्ष रहीम शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम व शारीरिक शिक्षणाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव ज़ाकिर शेख, शाळा व्यवस्थापण समितिचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक समीउर रहेमान सर, सायमा मैडम व सर्व शिक्षकगण, विद्यार्थी, आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते .

+ There are no comments
Add yours