*जामनेर तालुका सरपंच आरक्षण सोडत १०७ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण निश्चित.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज

जामनेर तालुका सरपंच आरक्षण सोडत १०७ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण निश्चित.

जामनेर (प्रतिनिधी):- दि. ८ जुलै २०२५ रोजी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत प्रक्रिया उत्साहात व पारदर्शक पद्धतीने पार पडली. सदर सभा पंचायत समिती सभागृहात पार पडली असून, यामध्ये जामनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जामनेर पंचायत समिती हॉल मध्ये १०७ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीसाठी जमलेले विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व मार्गदर्शन करतांना तहसीलदार नानासाहेब आगळे

 जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे मार्गदर्शनाखाली सदर सोडत सभेचे आयोजन करण्यात आले होते.अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या चार प्रवर्गांनुसार १०७ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले. आरक्षण निश्चित करताना महिला आरक्षणासाठी चिठ्ठीद्वारे सोडत प्रक्रिया मा. उपविभागीय अधिकारी जळगाव (भाग) विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

कार्यक्रमात ७ वर्षांची कुमारी डिंपल पवार हिच्या हस्ते पारदर्शक बरणीमधून चिठ्ठ्या काढण्यात येऊन महिला सरपंच आरक्षणासाठीची सोडत कार्यवाही पूर्ण करण्यात आली.

याप्रमाणे एकूण ५५ ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे.

सदर सोडत प्रक्रियेत प्रशासकीय पारदर्शकता, कायदेशीरता व लोकसहभाग यावर भर देण्यात आला. सर्व ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या शंका निरसन करून समाधानकारक वातावरणात सोडत प्रक्रिया पार पाडली गेली.

जामनेर तालुक्यातील टोटल १०७ ग्रामपंचायत सरपंच आरक्षण

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours