*क्रांती जोती बचत गटाची वार्षिक सभा उत्साहात संपन्न*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

बचत गटाचे बँकिंग स्वरूपात मार्गक्रमण व्हावे – श्रीकांत अहिरे

जामनेर (प्रतिनिधी):- शहरातील बसस्थानक समोरील हॉटेल सदगूरू मध्ये दि.5 रोजी संध्या. ७:३० वा. क्रांती जोती बचत गटाची वार्षिक सर्वसाधारण सभा गटाचे सचिव जितेन्द्र गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली.बचत गटाच्या माध्यमातून घेतलेल्या जास्तीत कर्जाचा बचत निधी वापर उद्योग व्यवसायासाठी करावा व बचत गटाचे बँकिंग स्वरूपात मार्गक्रमण व्हावे तसेच विविध उपप्रकल्पात सहभाग घेऊन गटाच्या व आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करावी. असे मनोगत क्रांती जोती बचत गटाचे मार्गदर्शक श्रीकांत अहिरे यांनी व्यक्त केले.

वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थीत क्रांती जोती बचत गटाचे सभासद

यावेळी सर्वसाधारण सभेत मागील वर्षाचा हिशोब, जमा खर्चास मंजूर देवून कर्ज वाटप मर्यादा १५ ते २० हजार पर्यंत ठरविण्यात आली. मासिक वर्गणी १००० व व्याजदर २% ठेवण्यात आले. सभासदांनी आपली कागदपत्रे लवकरात लवकर जमा करून बचत गटाचे नवस्वरूप व पुढील वर्षाचे नियोजना बाबत गटाचे सचिव जितेंद्र गोरे यांनी माहिती विशद केली. यावेळी 

गटाचे सभासद संदीप महाजन, अमोल देशमुख, रमेश वराडे, श्रीकांत अहिरे, अश्विन रोकडे, लक्ष्मीकांत बेदमूथा, किशोर पाटील, गोपाल राऊत, गणेश चवरे, ईश्वर जंजाळकर, नरेंद्र बर्वे, भगवान माळी, ऋषिकेश पवार, विजय भोपळे, निलेश सपकाळ, योगेश्वर पाटील उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप महाजन, सुत्रसंचलन अश्विन रोकडे तर आभार जितेंद्र गोरे यांनी मानले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours