*जामनेरात उद्या खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

साहित्य रसिकांना मेजवानी .

जामनेर(प्रतिनिधि):- तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळा तर्फे रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी १५ वे खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्य रसिकांनी संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .

      उदयोन्मुख मराठी साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देणाऱ्या जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे यंदा पंधरावे खान्देश स्तरीय मराठी साहित्य संमेलन होत असून  धुळे येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापिका त्रिशीला साळवे  अध्यक्षस्थान भूषविणार आहेत .  पाचोरा येथील एम.एम. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ . शिरीष पाटील व ओम शांती चंदाबाई अमृतलाल बोहरा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अनिल कुमार बोहरा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे .जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून माझी पंचायत समिती  सभापती बाबुराव घोंगडे समारोपीय सत्राला उपस्थित राहणार आहेत . 

या संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे .  कथाकथन सत्राचे अध्यक्ष स्थान विश्वास पाडोळसे बसवणार असून प्रा. पुरुषोत्तम महाजन  यांचे प्रमुख उपस्थिती लाभणार आहे . निमंत्रितांचे कवी संमेलन ज्येष्ठ साहित्यिक सुभाष किन्होळकर , प्राध्यापक बी एन चौधरी व ज्येष्ठ साहित्यिक मधु पांढरे भुषवणार आहेत. साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या खानदेशस्त्रीय काव्य लेखन स्पर्धेतील विजेत्यांसह विशेष सत्कारमूर्तींना गौरविण्यात येणार आहे. उपस्थितीचे आवाहन जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डी .डी .पाटील , उपाध्यक्ष मधुकर पांढरे , सचिव गोरख सूर्यवंशी , सहसचिव जितेंद्र गोरे , खजिनदार सुखदेव महाजन यांच्यासह संचालक मंडळ व संमेलन नियोजन समितीने केले आहे .

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours