पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
तहसील कार्यालयात मा.तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली ग्राहक दीन संपन्न.
जामनेर – २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून भारतभर साजरा केला जातो. ग्राहकांच्या हक्क आणि अधिकाराचा जागर करण्याचा हा दिवस. २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षणं कायदा पास झाला. त्यानुसार, जिल्हास्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, राज्य तक्रार निवारण आयोग आणि राष्ट्रीय आयोग अशी ग्राहक न्यायालये स्थापन झाली आहेत, तसेच जिल्हास्तरावर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद आणि राज्य ग्राहक संरक्षण परिषद कार्यरत आहेत. दी.२४ रोजी ३८ वा राष्ट्रीय ग्राहक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. त्या निमित्ताने येथील तहसील कार्यालयात तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्राहक पंचायत चे जिल्हा संघटक प्रल्हाद सोनवणे तालुकाध्यक्ष डॉक्टर उमाकांत पाटील यांच्या उपस्थितीत ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पुरवठा निरीक्षक श्री सुर्वे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.प्रास्ताविक राजेंद्र देशपांडे यांनी तर आभार सुनील कुलकर्णी यांनी मानले. या वेळी ग्राहकांच्या वतीने मुसा पटेल, रउप शेख यांनी ग्राहकांच्या समस्या मांडल्या. तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी ग्राहकांचे अधिकार व कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी अधिकारी पदाधिकारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
+ There are no comments
Add yours