*मा.ना.गिरीश भाऊ महाजन यांचे जामनेर नगरीत भव्य स्वागत.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

जामनेर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ३:० टर्म च्या टीमचे खाते वाटप जाहीर झाले असून जिल्ह्यातील ना.गिरीश महाजन(जलसंपदा) , ना.गुलाबराव पाटील(पाणी पुरवठा), ना.संजय सावकारे (वस्त्र उद्योग) या तिघही कॅबीनेट मंत्र्यांना मोठे खाते मिळाले आहे .तिघही मंत्र्यांचे आप आपल्या मतदार संघात मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले.

जामनेर नगरीचे शिल्पकार ना. गिरीश भाऊ महाजन यांचे जामनेरात जोरदार भव्य – दिव्य स्वागत करण्यात आले असून कार्यकर्ते दुपारी २ वाजेपासून गिरीश भाऊ महाजन यांच्या आगमनाची वाट पहात होते. शेवटी संध्या.६:३० वाजेला त्यांचे आगमन जामनेरात झाले. आय टी आय जळगांव रोड येथून ना. गिरीश भाऊ महाजन यांची वाजत गाजत भव्य दिव्य अशी स्वागत मिरवणूक काढण्यात आली. सोबत फटक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

स्वागत मिरवणुकीत लाडक्या बहिणींनी ना.गिरीश भाऊ महाजन यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा रूपी आशीर्वाद दिले.मिरवणूक डॉ. बाबसाहेब आंबेडकर चौकात आल्या नंतर मंत्री महोदयांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले नंतर राजमाता जिजाऊ चौकात जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वागत मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थीत होते.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours