पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
तहसीलदारांना लोकशाही दिनी निवेदन सादर.
जामनेर – धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक विरोधी पथकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जामनेर तालुका तलाठी संघाने कामबंद आंदोलन फुकारले असून या आशयाचे निवेदन जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना लोकशाही दिनी देण्यात आले आहे. त्याचे सविस्तर असे की, दि.१९ डीसे.रोजी मध्यरात्री २.१५ वाजता तहसील कार्यालय, धरणगाव येथील अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथक चांदसर बु. ता.धरणगाव येथील गिरणा नदीपात्रात गस्त घालत असतांना वाळूने भरलेले अवैध ट्रॅक्टर नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी व काही तलाठी यांनी पकडले असता. ट्रॅक्टर मालक, चालक आणि तेथील मजूर असे १२ ते १५ लोकांनी पथकावर हल्ला केला. त्यात तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर फावड्याने जबर वार करून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यात दत्तात्रय पाटील यांचा डावा पाय मोडला असून सध्या ते जळगाव येथील दवाखान्यात उपचार घेत आहेत. अशा या अमानुष मारहाणीचा जामनेर तालुका तलाठी संघाने जाहीर निषेध केला असून.असे विना संरक्षण असणारे काम कायमस्वरूपी बंद करण्यासाठी तसेच जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत जळगाव जिल्हा तलाठी संघाच्या आदेशानुसार जामनेर तलाठी संघ बेमुदत काम बंद आंदोलन पुकारत असल्याबाबत चे निवेदन जामनेर तहसीलदार यांना दी.१९ लोकशाही दिनी देण्यात आले. यावेळी विरेंद्र एस सोनकांबळे, विजय पाटील, एस के पडांगळे, पि.पि.सोळुंके, एच डी ढोके,दिलीप आंधळे, अमोल डोईफोडे, शुभम सोनटक्के, पाटील शंकर , सि जी. डोंगरे,शिवसागर हिवाळे,संतोष मुंडे, व्ही एम पाटील, व्ही आर तडवी,मोहित सी. पाटील ,एम.आर. उंबरकर, डी डी कोष्टी, शेख शकील,फिरोज खान,एच. व्ही वाघ आदी तलाठी व मंडळ अधिकारी उपस्थीत होते.
+ There are no comments
Add yours