*डॉ. प्रशांत भोंडे यांनी गिरीश भाऊ महाजन यांना विजयी करण्याचे केले आवाहन.*

जामनेर (प्रतिनिधी):- विधानसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी आज दी.१९ रोजी जामनेर नगर परिषदेचे गट नेते डॉ. प्रशांत भोंडे यांनी मतदार संघातील जनतेला गिरीश भाऊ महाजन यांना निवडून आणण्यासाठी आवाहन केले आहे.

डॉ. भोंडे यावेळी बोलतांना म्हणाले की,महायुतीचे उमेदवार गिरीश भाऊ महाजन हे स्टार प्रचारक असल्याने त्यांनी आपल्या स्वतःच्या मतदार संघात एकही मोठी सभा न घेता ईतर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निवडूण आणण्यासाठी आहोरात्र मेहनत घेतली असून आपल्या स्वतःच्या मतदार संघाची जबाबदारी त्यांनी सौ. साधनाताई महाजन यांच्यासह कार्यकर्त्यांवर सोपवली असल्याने साधनाताईंनी व कार्यकर्त्यांनी आज पर्यंत मतदार संघात झंझावाती प्रचार केला असून साधनाताईंना जनतेने भरघोष मतांनी गिरीश भाऊ महाजन हे विजयी होतील असे अस्वस्त्त केले असल्याने जामनेर मतदार संघातून गिरीश भाऊ हे ७ व्यांदा विजयी होतील व तालुक्यात सूरू असलेला विकासाचा रथ असाच पुढे जात राहील याबाबत कोणाचेही दुमत नाही. तरी मतदार संघातील मतदारांनी पुन्हा गिरीश भाऊंना महाजन यांच्या पाठीशी विजयी रूपी आशीर्वाद असेच सोबत राहू द्यावे व येणाऱ्या २० तारखेला भाऊंना मताधिक्य मिळवून द्यावे असे आवाहन डॉ. भोंडे यांनी केले आहे.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours