बॉडी बिल्डिंग स्पर्धेत जामनेरचा तेजस चमकला.
जामनेर (प्रतिनिधी):- आंतर महाविद्यालयीन मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेमध्ये ७५ ते ८० वजनी गटामध्ये शहरातील गीताई नगर मधील रहिवाशी जामनेर नगर परिषद मध्ये कार्यरत असलेले संजय सोनार यांचे चिरंजीव तेजस सोनार
यांने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल प्राप्त केले आहे.त्याच्या या यशा बद्दल भारतीय जनता पार्टीचे नेते तथा जा.ता.एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांच्या हस्ते त्याचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तेजस सोनार या तरुणाचे तालुक्यातील सर्वच स्तरातून होत आहे.यावेळी भारतीय जनता पार्टीचे चिटणीस प्रल्हाद सोनवणे, भास्कर महाजन ,मिलिंद पाटील ,दिलीप जाधव, अतुल कुमावत, गौरव सुपेकर, निलेश सोनार, बंटी निकम, रुपेश बिराडे यांच्यासह जयसिंग ग्रुप चे सर्व सदस्य उपस्थित होते.

+ There are no comments
Add yours