*पळासखेडा मीराचे येथे माजी विद्यार्थ्यांचा भरला स्नेहमेळा.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह

नि. पं. पाटील विद्यालयात इयत्ता १० वी २००२- ०३ च्या बॅच भरला स्नेहमेळावा.

जामनेर (प्रतिनिधी):-  तालुक्यातील पळासखेडा मीराचे येथील नि.प.पाटील विद्यालयात २००२- ३ मध्ये शिकत असलेल्या इयत्ता १० वीच्या बॅचचा स्नेह संमेलन कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान त्यावेळेसचे मुख्याध्यापक बी.ए. सोनवणे यांनी भूषविले. तसेच कार्यक्रमासाठी नि.पं.पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.आर पाटील तसेच टी . टी.इंगळे ,चौधरी सर तसेच सेवानिवृत्त शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात निळकंठ पंढरीनाथ पाटील विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीताने केली. त्यानंतर विद्येची देवता माँ.सरस्वती, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच विद्यालयाचे संस्थापक कै.गजाननराव गरुड यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्याकडून सन २००२ – ३ च्या बॅचचे ८ मयत विद्यार्थी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व शिक्षक वृंदांचा सत्कार  विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.यावेळी बॅचचे ९० विद्यार्थी व ३४ विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला बी.ए. सोनवणे व्ही.आर. पाटील , एम एल पाटील ,कळस्कर सर,आर. पी .पाटील ,एम.डी. पाटील मॅडम,टी. टी. इंगळे आदी गुरुजनांनी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणींचा उजाळा देऊन आयुष्यात शिक्षण क्षेत्राचे महत्त्व पटवून दिले.तसेच बॅचचे अलग- अलग क्षेत्रात नोकरीला लागलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी माजी विद्यार्थी योगेश जाधव, दत्ता साबळे,दगडू सोनवणे, सिद्धार्थ वाघ,वासुदेव मोहणे,प्रदीप राजपूत व माजी विद्यार्थिनी दिपाली राजपूत यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील मित्राच्या आठवणींचा उजाळा देऊन मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॅचचे माजी विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक योगेश हनुमंत जाधव मोहाडी यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माजी विद्यार्थी वासुदेव मोहणे उपशिक्षक सिल्लोड यांनी केले. या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला रंगरंगोटी करण्यासाठी ५१००० रुपयाची देणगी दिली. नि. पं. पाटील विद्यालयात आज बॅचच्या माजी विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने शाळा भरली असल्याची भावना यावेळी माजी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी योगेश जाधव मोहाडी,अनिल बागुल मोहाडी निलेश राजपूत,सतीश पाटील पळासखेडे मिराचे, रवी हडप पळसखेडे मिराचे,डॉक्टर संदीप साबळे,मिलिंद पाटील, योगेश वाघ करमाड,प्रदीप पाटील जळके, डॉक्टर जिवन परदेशी विटनेर,प्रकाश बोरसे नेरी बु.,दत्ता साबळे सुनसगाव,गणेश गावंडे सवतखेडा तसेच चारुशीला पाटील,मनीषा पाटील,दिपाली राजपूत पळासखेडे मिराचे या माजी विद्यार्थ्यांनी  खूप परिश्रम घेतले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours