पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
दिल्ली – स्पेडेक्स’चे (Spadex) PSLV-C60 द्वारे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करून भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने इतिहास रचला.
भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमा, उपग्रहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हे तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरणार आहे. अंतराळ डॉकिंगचा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
+ There are no comments
Add yours