इंदिराबाई ललवाणी विद्यालयाचा सुमित चिंचोले कांस्य पदकाचा मानकरी.

जामनेर(प्रतिनिधि ):-  महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या  तर्फे घेण्यात आलेल्या १९ वर्ष आतील मुले शालेय विभागीयस्तरीय शासकीय मैदानी (ॲथलेटिक्स) स्पर्धा दि.१९ रोजी नाशिक विभागीय क्रीडा संकुल,हिरावडी रोड, नाशिक येथे नुकत्याच संपन्न झाल्या.
जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील  सुमित संजय चिंचोले (इयत्ता १२ वी विज्ञान ) याने ११० मीटर  अडथळा शर्यत तृतीय क्रमांक प्राप्त करत १९.०१ सेकंद वेळ राखत कांस्यपदक पटकावले.नाशिक क्रीडा अधिकारी बी आर जाधव यांच्या हस्ते त्याला पदक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक मनपा, ग्रामीण एकूण १३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.या यशाबद्दल त्याचे इंदिराबाई ललवाणी शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष राजेंद्र महाजन, सचिव किशोर महाजन, मुख्याध्यापक एस आर चव्हाण, उपमुख्याध्यापक एस एन चवरे, उपप्राचार्य प्रा.के एन मराठे, पर्यवेक्षक प्रा.के डी निमगडे, पर्यवेक्षक प्रा.जी जी अत्तरदे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव राजेश जाधव, जामनेर तालुका क्रीडा संयोजक डॉ.आसिफ खान, बी पी बेनाडे, जी डी कचरे आदींनी अभिनंदन केले. चिंचोले यास क्रीडा विभाग प्रमुख जी सी पाटील, प्रा.समीर घोडेस्वार यांचे सहकार्य लाभले.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours