पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत ४ दुचाकी हस्तगत.
जळगाव – जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून मोटरसायकली चोरून त्यांची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे .त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपयांच्या ४ मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
या बाबत सविस्तर असे की , जळगांव शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकल ही पाचोरा तालुक्यातील कळमसरा येथील गोपाल तेली वय (42 )हा वापरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यावरून त्याचा शोध लावून त्याची कसून विचारपूस केली असता. त्याने व त्याच्या साथीदाराने जिल्ह्यातून मोटरसायकली चोरल्याची कबूली दिली. यात जळगाव शहर पोलीस स्टेशन, जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशन, आणि चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यातील ४ मोटरसायकली चोरीस गेल्याचे गुन्हे दाखल असल्याने आरोपी गोपाल तेली यास पुढील कार्यवाहीसाठी जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन देशमुख ,विनोद पाटील ,विष्णू बिराडे ,ईश्वर पाटील ,राहुल महाजन यांच्या पथकाने केली असून अजुनही काही मोटार सायकल चोरीचे गून्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
+ There are no comments
Add yours