जामनेर (प्रतिनिधी):- विधानसभा निवडणूक ही रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून महायुतीचे उमेदवार गिरीश भाऊ महाजन यांच्या कडून नुकतीच तालुक्यातील व्यापारी वर्गाची मीटिंग बाबाजी राघो मंगल कार्यालयात बोलवण्यात आली होती. या मीटिंगला प्रसिद्ध उद्योग पती माजी आमदार मनीष जैनसह तालुक्यातील व्यापारी वर्ग उपस्थित होता. यावेळी बोलतांना मनीष जैन यांनी तालुक्यात गिरीश भाऊ महाजन यांनी केलेल्या विकास कामांचे तोंड भरून कौतुक केले. व आपल्या भाषणातून गिरीश भाऊ महाजन यांनाच पुन्हा निवडून देण्याचे आवाहन जमलेल्या व्यापारी बांधवांना केले होते. यावर जामनेर येथील प्रसिद्ध व्यापारी व नगर परिषदेचे माजी नगर अध्यक्ष राजू शेट बोहरा यांनी मनीष जैन यांच्या भूमिकेचे खंडन करुन, सांगीतले की, मनीष जैन हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असल्याने व अजित पवार गट हा महायुतीमध्ये असल्याने त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाच्या वतीने जाहीर केली.मात्र ईश्वर बाबूजी जैन हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांच्या सोबतच असल्याने जामनेर मध्ये ईश्वर बाबूजी जैन यांनी सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवलेली असून मनीष जैन यांचा कांगावा न करता आम्ही सर्व जण शरद पवार साहेब यांच्या सोबतच असून महाविकास आघाडीचे आपले उमेदवार दिलीप खोडपे सर यांना विजयी करण्याची जबाबदारी माझ्यासह सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची असून कुठलाही गैरसमज वा अफवा पसरवू देऊ नका असा व्हिडिओ राजू शेट बोहरा यांचा सोशल मीडिया वर शेअर झाला असून महाविकास आघाडीच्या,पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व मतदारांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. आपले एकच मिशन दिलीप खोडपे सरांच्या मागे उभे राहून त्यांना निवडून आणणे हेच आहे. असे त्यात त्यांनी म्हटले आहे.
*मनीष जैन यांचा कांगावा न करता खोडपे सरांच्या मागे उभे रहा – मा. नगराध्यक्ष राजू बोहरा *

+ There are no comments
Add yours