जामनेर (प्रतिनिधी):- महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिलीप खोडपे (सर) यांच्या प्रचारार्थ जामनेर येथे दी.१४ रोजी दुपारी ४ वाजता खा.अमोल कोल्हे यांच्या रोड शो चे आयोजन करण्यात आले होते. जळगांव रोड आय टी आय पासून खा.कोल्हेंच्या रोड शो ला सुरूवात करण्यात आली होती . रोड शो दरम्यान खोडपे सर व खा.कोल्हे यांनी महामानव डॉ. बाबसाहेब आंबेडकर व जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खा.अमोल कोल्हें यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे सर यांना विजयी करण्याचे आवाहन केले. रोड शो सूरू असतांना तास भर मेन रोड वरील ट्रॅफिक जाम झाल्या मुळे बऱ्याच वाहन धारकांना अडचणीचा सामना करावा लागला. झालेल्या त्रासा बद्दल आयोजकांनी वाहन धारकांची माफी मागून दिलगिरी व्यक्त केली आहे.रोड शो सूरू असताना कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता.

+ There are no comments
Add yours