पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज
छत्रपती शिवरायांच्या काळातील ऐतिहासिक 12 किल्ल्यांना युनेस्को ने दिला जागतिक वारसाचा दर्जा.
जामनेर तालुक्यातील नेरीत जल्लोष.
जामनेर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील १२ गड किल्ल्यांना युनेस्को ने जागतीक वारसाचा दर्जा देवून आंतरराष्ट्रीय स्तरावर तमाम मराठी अस्मितेचा मान वृध्दींगत केला.
या ऐतिहासिक क्षणाचा जल्लोष दी.१२ रोजी तालुक्यातील नेरी येथील म्हसावद चौफुली स्थित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी भाजपच्या वतीने करण्यात आला.यावेळी महाराजांना अभिवादन करण्यात आले व प्रचंड जयजयकार करून एकमेकांना पेढे भरवून हा आनंदाचा क्षण साजरा करण्यात आला.

यावेळी तालुका प्रमूख (पश्चिम क्षेत्र) कमलाकर पाटील,गटप्रमुख तुकाराम निकम, नाना पाटील, मा सभापती शेखर काळे, भगवान इंगळे, अनिल पाटील ,सुभाष वाघोडे , आशिष दामोदर, दत्ता पाटील, चेतन पाटील , हर्षल चौधरी, श्रीकांत चौधरी, जगु झांबरे, मधू नारखेडे, एस टी अण्णा, यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


+ There are no comments
Add yours