*जामनेरात ग्रामीण महिला बचत गटांना मिळणार हक्काचे व्यासपीठ.*

पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह न्यूज

साधनाताई महाजन व मिनल कारणवाल यांच्या हस्ते झाले रोजगार संकुल मार्टचे भूमिपूजन.

जामनेर (प्रतिनिधी):-  महिला बचत गटांना स्वतःच्या कर्तृत्वाचे, हक्काचे व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने जिल्हा विकास आराखडा अंतर्गत बहिणाबाई मार्ट रोजगार संकुलाचे भूमिपूजन दी३ रोजी ये.थील वाकी रोड स्टेट बँकेच्या समोर माजी नगराध्यक्षा सौ.साधनाताई महाजन ,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जे के चव्हाण, भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते कुदळ टाकून करण्यात आले.तालुक्यातील महिला बचत गटांना स्वतःचे उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार आहे.

भूमीपूजन करतांना सौ. साधनाताई महाजन, श्रीमती मिनल करणवाल, जे के चव्हाण साहेब , चंद्रकांत बाविस्कर, श्रीकृष्ण इंगळे आदी.

या नियोजीत मार्ट मध्ये खालच्या मजल्यावर ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहांनी तयार केलेली उत्तम प्रतीची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.जे महिलांच्या उत्पन्नवाढीला नवे बळ देतील. दुसऱ्या मजल्यावर विभागीय कार्यालय उभारले जाणार असून, तिथे संबंधित कामकाज पार पाडले जाईल. या मार्ट मध्ये खाद्यपदार्थांचा फूड स्टॉल उभारण्यात येणार असल्याने ग्राहकांना चवदार पदार्थांचा आस्वाद घेता येईल. अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी माध्यमांना यावेळी दिली.या उपक्रमामुळे तालुक्यातील महिला बचत गटांना आर्थिक सक्षमीकरणाचा आणि स्वावलंबनाचा मार्ग मोकळा होणार आहे. यावेळी जे. के. चव्हाण,भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण इंगळे, राजू लोखंडे वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,जी. व्ही. पाटील,हरेश्वर भोई,कैलास काळे,ज्ञानेश्वर बाविस्कर सह पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारीही उपस्थित होते. 

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours