पंढरीनाथ पाटील/जामनेर लाईव्ह
जामनेर(प्रतिनिधी):- येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कॉपीमुक्त अभियान अंतर्गत जनजागृती सप्ताह निमित्त संस्थेचे ज्येष्ठ संचालक अँड.शिवाजी नाना सोनार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच इयत्ता दहावी बारावीचे विद्यार्थी यांची मिटिंग घेण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र सोनवणे यांनी कॉपी मुक्त अभियानाची शाळा स्तरावर अंमलबजावणी करण्यासाठी जनजागृती अभियाना बाबत दिनांक २० जाने.ते २६ जाने.पर्यंत हे अभियान राबविण्याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच आपल्या केंद्रावर कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सर्वांनी बोर्डाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे व कोणी गैरमार्ग अवलंबणार नाही याची दक्षता घ्यावी. यावेळी सूत्रसंचालन विद्यालयाचे क्रीडाशिक्षक विलास पाटील यांनी केले. तर आभार विद्यालयाचे उपशिक्षक विनय खोंडे यांनी मांनले. सदर अभियान यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

+ There are no comments
Add yours