*जामनेरात जिनियस, शिक्षणाची जीनियस गुणवत्ता.*

पहिल्याच वर्षी लागला १० वी (सी बी एस ई) चा १००टक्के निकाल.
जामनेर (प्रतिनिधी):- शहरापासून जवळच असलेल्या व सोनेश्वर मंदिराच्या अगदी पायथ्याशी असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या जिनियस इंटरनॅशनल शाळेने अगदी कमी कालावधीत उतुंग अशी भरारी घेतली असून २०२६ या शैक्षणिक वर्षात १० वी सी बी एस ई पॅटर्नची पहिलीच बॅच १०० टक्के निकाल देऊन गेली आहे. त्यामुळे या शाळेच्या प्रगतीत वाढ झाली असून जामनेर शहरात या शाळेने नाव लौकिक मिळवले असल्याचे एकंदरीत दिसून येते.

२०१७ साली दोन छोट्याशा खोल्या, ६४ निरागस चेहरे आणि एक मोठं स्वप्न उराशी बाळगून जिनियस शाळेचा चा प्रवास सुरू झाला.त्या वेळी भव्य इमारत नव्हती, आधुनिक साधनं नव्हती पण होती ती जिद्द, विश्वास आणि काहीतरी वेगळं घडवण्याची तीव्र इच्छा शक्ती इवल्याशा रोपट्यासारखी रुजलेली ही शाळा,

आज काळाच्या ओघात एका बहरलेल्या, दिमाखदार वृक्षात रूपांतरित झाली आहे.त्या दोन खोल्यांचा प्रवास आज प्रशस्त, सुसज्ज आणि प्रेरणादायी इमारती मध्ये परावर्तित झाला आहे.या प्रवासात अनेक आव्हाने पेलत कठीण परिस्थितीच्या कालावधीत वाट अवघड वाटत असतांना प्रत्येक वेळी शिक्षकांचे समर्पण, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांनी जिनियस शाळेला पुन्हा उभं राहायला आणि पुढे चालत राहायला शिकवल,आणि आज या सगळ्या प्रवासाला एक सुवर्ण किनार मिळाली आहे.जिनियस शाळेचा पहिल्याच CBSE बॅचचा १००% निकाल.आणि या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. ९३. ८०% मिळवून मधुश्री कैलास गायकवाड ही प्रथम येऊन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे .हा फक्त निकाल नाही,हा आहे प्रत्येक स्वप्नाच्या पूर्णत्वाचा क्षण,प्रत्येक मेहनतीच्या घामाचा सन्मान,आणि प्रत्येक क्षणाला जिंकण्याचा उत्सव.संस्थेचे अध्यक्ष, सचिव, सर्व संचालक आणि प्राचार्यांनी यांनी या यशामागे उभ्या असलेल्या प्रत्येक शिक्षकाचे, प्रत्येक पालकाचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.ही तर केवळ एक सुंदर सुरुवात असून आगामी काळातही शिक्षणाच्या माध्यमातून अनेक आयुष्यं घडवण्याचा निर्धार संचालक मंडळाने व प्राचार्यांनी यावेळी केला आहे.कारण शाळेचे ‘यश’ म्हणजे फक्त निकाल नाही,तर प्रत्येक विद्यार्थ्याचं उज्ज्वल भविष्य असल्याची भावना संचालकांनी बोलून दाखवल्या आहेत.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours